Tag Archives: marathi poems

तुझी वाट पाहता

तुझी वाट पाहता 
तुझी वाट पाहता पाहता डोळे भरून आले,
वाचा फुटेना कंठ दाटून आला.
तू आलास असा भास झाला,
नक्की परत येशील हा मनी धस घेतला.
तुझ्या आठवणी मनात आहेत ताज्या,
तुझ्यावाचून जगणे झाली आहे सजा.
आमचा  जीवनाच्या अंती आम्हाला एकटे टाकून गेलास,
तुझ्हा फक्त आसरा हवा होता,
फाफुट पसारा सोडून गेलास.

_________________________

If you like this post, please leave your comments.  And yes,  go ahead and share it !
Advertisements

बुडूनही जगावे

बुडूनही जगावे  

समूद्र किनार्यावर पाण्यात फक्त पाय घालून येत नाही मजा,
तशीच प्रेमाच्या सागरात बुडाल्या शिवाय येत नाही मजा.
बघणारे म्हणतात अरे हा तर गेला कामातून,
पण बुडणारा म्हणतो, किती बर वाटते पहा तर बुडून.
प्रेमाच्या सागरात नसते कुणाची भीती,
फक्त प्रेमच असते अवती भवती.
प्रेमाच्या सागरात लागत  नाही श्वास,
फक्त मनात असावा विश्वास.
प्रेमाच्या सागरात लागत नाही तहान भूक,
चोहीकडे प्रेमच असते कधी न संपणारे सुख.
प्रेमाच्या सागरात लागत नाही थंडी,
दोन जीवांची उब असते, उबतील सुधा दोन-चार अंडी.
प्रेमाच्या सागरात राहायला लागत नाही भाडे.
एकमेकांच्या हृदयात राहायला कसले आले भाडे.
फक्त काळजी घ्यावी गैर समाजांच्या भाव्र्यांची .
समजून घ्यावी भीती खोल दर्यांची.
असे हे सुंदर जग या प्रेमाच्या सागरात,
बुडूनही जगावे ह्याच सागरात.
___________________________________________________________________________
If you like this post, please leave your comments.  And yes,  go ahead and share it !